नदीत पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू
USER

नदीत पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील रामकुंडानजीक Ramkund- Nashik दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नदीत पडल्याने दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू drown in river झाल्याची घटना समोर आली आहे.

पहिल्या घटनेत आपल्या कुटुंबासोबत देव दर्शनासाठी आलेल्या रावसाहेब संतोष महाजन (वय ३६ ) रा. गणेश कॉलनी,उत्तम नगर, सिडको गांधी तलावात पाय धूत असताना घसरून पडले आणि त्यात त्यांचा अंत झाला. जीवक रक्षकांनी बाहेर काढले असता त्यांचे मेहुणे यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉ राहुल पाटील यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत ओवेस नदीम खान (वय १८) रा गणेश नगर वडाळा गाव हा तरुण गंगेवर अंघोळीसाठी गेला असता अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मयत झाला. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com