Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु

Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

चेहडी येथील दारणा नदीच्या पात्रात (Darna River) मोठ्या प्रमाणात पाणी (Water) सोडण्यात आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी दोघेजण दारणा नदीच्या पात्रात बुडाल्याची (Drowned) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) त्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे....

Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु
बॉलिवूडवर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे कॅन्सरने निधन

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थ गांगुर्डे (१७), राहुल महानुभाव (१८), संतोष मुकणे व आर्यन जगताप सर्व राहणार (सिन्नर फाटा) हे दारणा नदीवर पोहण्यासाठी (swim)गेले होते. त्यातील दोघांनी नदीतील पाण्याच्या प्रवाहात पुर्वेच्या दिशेला उड्या मारलेल्या असल्याने अंघोळ करत नदीच्या किनारी आले. मात्र, सिद्धार्थ गांगुर्डे व राहुल महानुभाव हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे कठीण झाले होते.

Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु
Biparjoy Cyclone : 'बिपरजॉय' चक्रीवादळाची तीव्रता वाढली, दिसणार अती रौद्ररुप... महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

त्यानंतर त्या दोघांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली. मात्र तोपर्यंत त्यांचा दम झाल्याने ते बुडाले. यानंतर त्यांचा सहकारी संतोष मुकणे याने त्यांच्या घरच्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलास कळविले असता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम केली. मात्र, ते युवक सापडले नाही.

Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु
ये डर अच्छा है..! संजय राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजप स्वत:च निर्माण केलेल्या जाळ्यात...”

दरम्यान, या घटनेमुळे सिन्नर फाटा परिसरात (Sinner Phata Area) हळहळ व्यक्त करण्यात येत असून आज सकाळपासून (रविवार) अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून या युवकांचा (Youth) शोध घेण्याचे काम सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com