बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील रायते (Raite) येथे अगस्ती नदीच्या (Agasti River) बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, भाटगाव (Bhatgaon) येथील दीपक मिटके (वय १८) (Deepak Mitke) हा बारावीत शिक्षण घेणारा तरुण व डिग्रीचे शिक्षण घेण्यासाठी मांडवड (ता.नांदगाव) येथील आतेभाऊ तुषार उगले (Tushar Ugale) हे दोघे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजताच त्यांनी रुग्णवाहिका (Ambulance) पाठवून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, या घटनेची पोलिसात ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास येवला शहर पोलीस (Yeola City Police) करत आहेत. तसेच या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com