पुराच्या पाण्यात दोन तरुण बेपत्ता

पुराच्या पाण्यात दोन तरुण बेपत्ता

सुरगाणा | प्रतिनिधी

तालुक्यातील गुलाबी गाव नावाने सुपरिचित असलेल्या भिंतघर ( Bhinghar )येथील दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरु असून नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. भिंतघर येथील सुरेश आबाजी कडाळी (२५), विजय पांडुरंग वाघमारे (२३) व प्रभाकर त्र्यंबक पवार (२८) हे तिघेही सोमवारी कामानिमित्त बुबळी येथे गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान भिंतघर येथील घरी परतत असताना जामनेमाळ जवळील फरशी पुलांवरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटार सायकलने जाताना तिघेही पडले.

यात सुरेश कडाळी व विजय वाघमारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर मागे बसलेला प्रभाकर पवार सुदैवाने बचावला. पुलापासून काही अंतरावर मोटरसायकल व छत्र्या मिळून आल्या. मात्र दोघे अद्याप मिळून आले नाहीत. याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली असून नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. नातेवाईक चिंतेत आहेत.पोलिसांकडून दोघांचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com