दोन वर्षांनंतर रमजान पर्व उत्साहात

दोन वर्षांनंतर रमजान पर्व उत्साहात

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

आज ईद ऊल फित्र (Eid ul Fitr) म्हणजेच रमजान ईदच्या (ramdan eid) निमित्ताने गावाबाहेर देवीरोडवरील इदगाह मैदानावर खतीब ऐ शहर मुजाहिद खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुस्लिम बांधव (musilim community) एकत्र जमले होते. मर्कज अहेले सुन्नत गौसिया मस्जिदचे खतीबो ईमाम अब्दुल मोहित रजा यांनी नमाज (namaj) पठण केली. देशभरातील गढुळ असलेल्या वातावरणात सुख शांती समाधानाची प्रार्थना अल्लाहकडे यानिमित्ताने करण्यात आली.

आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करुन प्रेम व आंनंदाने ईद (eid celebration) साजरी केली जात असते. रमजान पर्व हा एक महिन्याचा काळ बांधवांसाठी उत्सवाचा असतो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मुस्लिम बांधवांसह सर्वांनाच आपले सण साजरे करता आले नव्हते. यंदा शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे ईद निमित्त शहरातील काजीपुरा, खडकपुरा भागातील दर्गातही मुस्लिम बांधवांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी नवीन कपडे परिधान करत सकाळी नमाज पठण केले.

यानंतर प्रत्येकाने आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शुभेच्छा दिल्या. देवी रोड परिसरातील ईदगाह मैदानावर लहाणग्यांपासून आबालवृद्धांनी कडक उन्हात गर्दी केली होती. यानंतर नमाज पठण करत एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, माजी नगरसेवक गोविंद लोखंडे, श्रीकांत जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, निवृत्त नायब तहसिलदार दत्ता वायचळे, उदय गोळेसर यांनी मनोगत व्यक्त करत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

जामा मस्जिदचे मौलाना मो.सिद्दीक नाईक, मदीना मस्जिदचे मौलाना मो.तन्वीर मुकिम, मक्का मस्जिदचे मौलाना अकिल रजा, गरिब नवाज मस्जिदचे मौलाना मो.सिद्दीक अन्सारी, तहसिलदार राहुल कोताडे, दत्ता जाधव, उदय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष कुंभार, डॉ. जी. एल. पवार, डॉ. विष्णु अत्रे, माजी नगरसेविका मालती भोळे, शितल कानडी, रविंद्र काकड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय काकड, डॉ. संदीप लोंढे उपस्थित होते. रियाज कोरबे व मुजाहीद खतीब यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सिन्नर पोलीस ठाणे व शांतता समितीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी ही यावेळी अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने हिंदु बांधवांना शुभेच्छा देऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.

बाजारातही तेजी

रमजानच्या पार्श्वभुमिवर गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम बांधव नवीन कपडे, चप्पल, टोपी खरेदी करताना दिसून येत होते. रोजासाठी लागणारे खजूर, मिठाई, फळे, लाईटिंग तसेच घरांना रंगरंगोटी करण्यासाठी रंग विक्री करणार्‍या दुकानांतही मुस्लिम बांधव खरेदी करताना दिसून आले. त्यामुळे रमजानच्या पार्श्वभुमिवर बाजारातही काही प्रमाणात तेजी आल्याचे दिसत होते. अनेक मुस्लिम बांधवांनी आजच्या दिवशी वाहन खरेदीचा मुर्हूत साधल्याचेही बघायला मिळाले.

जनसेवाकडून ईद साजरी

तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेने रमजान ईद निमित्ताने गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या कार्यालयात बांधवांना बोलवत त्यांना मिठाई भरवत त्यांचा शाल, पुष्पगुष्छ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी मनोगत व्यक्त करत गावातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी अर्जुन आव्हाड, राहुल तुपे, शंकर आमले, यासीन मनियार, गणीभाई मनियार, हरुन मनियार, जंगूभाई मनियार, सलमान मनियार, राहील मनियार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.