घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सक्तमजुरी

घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सक्तमजुरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हसरुळ (Mhasrul) परिसरात घरफोडी करून किंमती ऐवज सराईत चोरणाऱ्यास न्यायालयाने (Court) दोन वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे...

हसन हमजा कुट्टी (Hassan Kutty) (४०, रा. अश्वमेध नगर, पेठरोड) असे या संशयिताचे नाव आहे. म्हसरुळ येथील आदित्य गिफ्ट ॲड अप्लायसेंस दुकानात २३ ते २४ एप्रिल २०१८ रोजी चोरट्याने घरफोडी करून दुकानातील ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

याप्रकरणी मेघराज रमेश भोसले (Meghraj Bhosale) (३०, रा. हिरावाडी) यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात (Mhasrul police station) घरफोडीची फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून हसनला अटक (Arrested) केली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. पूनम जे. घोडके (Punam Ghodke) यांनी युक्तीवाद केला. हसन कुट्टीविरोधात गुन्हा शाबित झाल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आर. माने (V. R. Mane) यांनी कुट्टीस दोन वर्षे सक्तमजूरी व २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार एस. एल. जगताप (S. L. Jagtap) यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com