दुर्दैवी : लोणावळ्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

दुर्दैवी : लोणावळ्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

नाशिक/लोणावळा | प्रतिनिधी Nashik / Lonavala

वाढदिवस (Birthday) म्हटलं की, प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. वाढदिवसाचे अनेक नवनवीन ट्रेंड सध्या रुजत चाललेले दिसतात. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाळी पर्यटन आणि वाढदिवस असे काही घडावे म्हणून अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, वाढदिवसाच्या हटके सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात नातेवाईकांसह दाखल झालेल्या कुटुंबीयांसोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे...(Birthday Celebration in Lonavla)

आपल्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस यंदा लोणावळ्यात सेलिब्रेट (Celebration in Lonavla) करू या विचाराने हे कुटुंबीय लोणावळ्यातील एका छानशा हॉटेलमध्ये दाखल झाले होते. हॉटेलमध्ये रूम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असतानाच ज्या चिमुरडयाचा वाढदिवस होता, तोच जवळच्या स्विमिंग पूलमध्ये (Swimming Tank) पडला. यात चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे नाशिकसह लोणावळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, नाशिकमधील अखिल पवार कुटुंबीय (Pawar Family Nashik) गेल्या काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात आपल्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. घरातील १२-१३ पाहुण्यांच्या सोबत त्यांनी लोणावळा गाठले होते. वडील अखिल पवार (Akhil Pawar) यांनी लोणावळ्यात दाखल झाल्यानतर रूम बुकिंगसाठी प्रक्रिया सुरु केली. याच वेळी शिवबा हा रिसेप्शनच्या जवळच असलेल्या स्विमिंग पूलमधील खेळण्यांना पाहून आकर्षित झाला.

कुठलाही विचार न करत तो त्या स्विमिंग पूलकडे (Swimming Tank) धावत गेला. यावेळी कुणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नाही. यानंतर शिवबा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. यादरम्यान, तो स्विमिंग पूलमध्ये पडलेला दिसला. तात्काळ त्यास बाहेर काढण्यात आले. नाकातोंडात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले.

यानंतर तात्काळ त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Health Officer) त्यास मृत घोषित केले. चिमुरड्याच्या आनंदासाठी शेकडो किमी दूर येऊन वाढदिवस करण्याचे ठरवलेले असतानाच अचानक या चिमुरड्याचा अंत झाल्यामुळे सर्वदूर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com