नाशिक शहरात दोघींच्या आत्महत्या

नाशिक शहरात दोघींच्या आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी

शहरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी (दि.२९) रात्री विविध दोन घटनांमध्ये दोन युवतींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत...

शुभांगी ज्ञानेश्‍वर बागुल (२४, रा. माणिकनगर, नवीन नाशिक) असे आत्महत्या करणार्‍या मुलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी हिनेे गुरूवारी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास राहते घरी फॅनच्या हुकला ओढणी बांधून गळफास लावून घेतला.

दुसरी घटना नवीन नाशिकच्या महाराणा प्रताप चौक परिसरात घडली. येथील भाग्यश्री संतोष वायदंडे (२२) हिने गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहते घरी पत्र्याच्या पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तीस तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. या दोन्ही प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com