दुचाकी चोरटा जेरबंद

दुचाकी चोरटा जेरबंद

घोटी। वार्ताहर Ghoti

तालुक्यातून विविध ठिकाणांहून चोरलेल्या नऊ दूचाकींसह Two-wheeler पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दूचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सुमित सुनील कडू रा. खडकवाडी ( ता. इगतपुरी ) असे संशयिताचे नावे आहे. त्याने विविध कंपनीच्या परिसरात लक्ष ठेवत दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पावधीत गब्बर पैसेवाला होण्याच्या इच्छेतून दूचाकी चोरीकडे संशयित वळाला आहे. त्याने एकट्याने हे चोरीचे कर्म केले की, अजून काही जोडीदार त्याला होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सराईत सुमित कडू हा आपल्या घेर्‍यात येणार्‍या ग्राहकाला कौटुंबिक अडचण पुढे करत काही दिवसांसाठी पैसे मागत असे. त्या बदल्यात दुचाकी गहाण म्हणून ठेवत. यातून मिळणार्‍या पैश्यांचा वापर स्वतः मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी करीत होता.

कारवाई केलेल्या पोलिस पथकात उपनिरीक्षक संजय कवडे,हवालदार प्रकाश कासार,धर्मराज पारधी,लहू सानप,शरद कोठुळे,गोपनीय रमेश चव्हाण,मारुती बोर्‍हाडे आदींचा समावेश होता. पोलिसांच्या या कामगिरीची परिसरात चर्चा होत आहे. दूचाकी हरवलेल्या वाहनधारकांनी समाधान मानले.

Related Stories

No stories found.