दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

नाशिकरोड पोलिसांची कामगिरी
दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) व परिसरात सातत्याने दुचाकी (Two-wheeler) गाड्या चोरी (Theft) जात आहे. या अनुषंगाने नाशिकरोड पोलिसांनी (Police) दुचाकी गाड्या चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीस शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोटरसायकली त्याचप्रमाणे एकोणवीस मोबाईल जप्त करण्यात आले असून एक चेन स्नॅचिंगचा गुन्हाही पोलिसांनी उघडकीस आणला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड पोलीस स्टेशनचे (Nashikroad Police Station) गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विशाल पाटील (Vishal Patil) यांना गुप्त माहिती मिळाली की मोटर सायकल चोरी करणारे संशयित व या गाड्या विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा (Sinnar Phata) येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयश गांगुर्डे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे, अविनाश देवरे, विशाल पाटील, विष्णू गोसावी, संदीप बागल, राकेश बोडके, कुंदन राठोड, सोमनाथ जाधव, केतन कोकाटे, सागर आडणे आदींनी सिन्नर फाटा येथे सापळा रचला.

या सापळ्यात पोलिसांनी प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (22 रा. आडकेनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड), यज्ञेश उर्फ मेडी ज्ञानेश्वर शिंदे (रा. देवळाली गाव ,म्हसोबा मंदिरजवळ), अमन सुरज वर्मा (जय भवानी रोड), अक्षय उर्फ आर्या राजेश धामणे (26, भालेराव मळा जय भवानीरोड, नाशिकरोड) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

या चौकशीत गाड्या चोरल्याची त्यांनी कबुली दिली. त्याचप्रमाणे 19 मोबाईलदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच आप्पा सदाशिव धिवरे (रा. पळसे), साजिद शेख व आणखी दोन आरोपीकडून सहा मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ सोनसाखळी चोरणाऱ्या एका संशयिताला सुद्धा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आठ ग्रॅम सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज नाशिकरोड पोलिसांनी जप्त केला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com