भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीचालक ठार

भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीचालक ठार

एसटीचालक अटक


नाशिक | Nashik

भरधाव एसटीने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना २० एप्रिल रोजी मुंबई-आग्रा महामार्गवरील विमल हॉटेलसमोर, जुना जकातनाका, आडगाव येथे घडली.

पोलिसांनी एसटीचालकास अटक केली आहे. याप्रकरणी आनंदा धोंडीराम धोंडगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कल्याण (जि.ठाणे) येथील एसटीचालक संदीप शालीग्राम पाटील (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. धोंडगेवस्ती, आडगाव शिवार येथील धोंडीराम रामचंद्र धोंडगे (वय ६७) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित संदीप पाटील मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी (एमएच २०-बीएल २२६५) भरधाव वेगाने चालवत होता. तो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने एसटी घेऊन ओझरकडून नाशिककडे येत होता.

आडगावातील जुना जकातनाका येथे दुचाकीचालक धोंडीराम धोंडगे दुचाकी (एमएच १५-एझेड ८१४९)ने रस्ता ओलांडत होता. त्यावेळी पाटीलने भरधाव एसटीची दुचाकील धडक दिली. त्यात धोंडगे यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com