नवीन नाशिक : त्रिमुर्तीतून दोन दुचाकींची चोरी

नवीन नाशिक
नवीन नाशिक


नाशिक : Nashik

शहरातून दोन मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून याप्रकरणी अंबड व सातपुर पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना त्रिमुर्ती चौक परिसरात घडली. येथील घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याप्रकरणी दत्तात्रय नारायण बागुल ( रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, त्रिमुर्ती चौक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागुल यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच 15 सीवाय 7813) राहते घराच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली होती.

अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. हवालदार भड याप्रकरणी तपास करत आहे.
दुसरी घटना आयटीआय परिसरात घडली. अतुल बबन शिरसाठ (नंदन स्वीट मागे, त्रिमुर्ती चौक) याने त्याची मोटारसायकल क्र. (एमएच 15 ईके 3047) आयटीआय मैदानाबाहेर लॉक करून पार्क केली होती.

अज्ञात चोरट्याने त्याची मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार सोर तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com