जिल्ह्यात दिवसभरात अडीच हजार लसीकरण

लसींचा तुटवडा, 30 केंद्रांवरच लसीकरण
जिल्ह्यात दिवसभरात अडीच हजार लसीकरण

नाशिक । Nashik

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात 7 लाख 31 हजार 342 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. आज जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने केवळ 30 केंद्रांवर आज लसीकरण सुरू होते. दिवसभरात दोन्ही मिळून 2 हजार 757 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र लसींचा तुटवडा असल्याने आज केवळ नाशिक महापालिकेच्या 3 तर जिल्हाभरातील 28 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. जिल्ह्यातील उर्वरीत 10 हजार लसींचा साठाही संपआला असून नवीन साठ्याची प्रतिक्षा आहे.

दरम्यान आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा 1 लाख 23 हजार 989 जणांना पहिला तर 51 हजार 926 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमपैकी आतापर्यंत 2 लाख 29 हजार जणांना पहिला तर 45 हजार 47 जणांन दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांपुढील 2 लाख 50 हजार 857 जणंना पहिला तर 30 हजार 881 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 1 हजार 709 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 467, ग्रामिण जिल्ह्यात 1 हजार 131, मालेगाव 111 असे लसीकरण झाले आहे. तर 948 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

केंद्र शासनाने जाहिर केल्यानुसार 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्व वयोगटांतील नागरीकांचे लसीकरण करण्यात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आज दिवसभरात जिल्ह्यात पिंपळगाव, मोहाडी, इंदिरागांधी, मालेगाव नीमा, नाशिकरोड युपीएसी या पाच केंद्रांवर 947 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत या गटातील 2 हजार 302 जणांना लस देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com