व्हिडीओ स्टोरी : रवींद्र केडिया

व्हिडीओ : सतीश देवगिरे

सातपूर | प्रतिनिधी

सातपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशाची महाअंतिम फेरी साठी काल प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.शासकिय 21 व खासगी 23 आयटीआय प्रशिक्षणासाठी इच्छुक मुलांना या ठिकाणी महाअंतिम फेरीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित करण्यात आला.

सातपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्यालयात हा महाअंतिम प्रवेश सोहळा पार पडला. याठिकाणी आनलाईन पद्दतीने प्रवेश देण्यात येत होता. मुख्यालयातून यावर विशेष ली ठेवण्यात येत होते. नाशिक आयटीआयच्या 575 जागा तसेच जिल्हाभरातील 21 शासकिय आयटीआय व 23 खासगी आयटीआयच्या विविध कोर्सेस साठी प्रवेश निश्चित करण्यात आले.

सकाळी 8 वाजेपासूनच मुलांनी याठिकाणी गर्दी केलेली होती.गुणवत्ता यादीनुसार सुमारे 2 हजार मुलांनी नोंदणी केलेली होती.50 मुलांच्या गटाने प्रवेश प्रक्रिया हॉलमध्ये अनुक्रमांकानुसार सोडण्यात येत असल्याने प्रांगणात पालक व विद्यार्थ्यांची मोठी झूंबड दिसून येत होती.

या प्रक्रियेत मुलांद्वारे विशेषत: इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, मोटर मॅकेनिक, मशिनिस्ट या जागांसाठी विशेष रुची दिसून आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी याजागा फूल्ल झाल्या होत्या.मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत एक हजार मुलांचा प्रवेश निश्चित झाला होता. उर्वरित 1135 मुलांना बुधवारी प्रवेश देण्यात आला.

ज्या मुलांना आयटीआय प्रवेश मिळालेला नाही अथवा पॉर्म भरता आलेला नाही त्या सर्वांसाठी एक जानेवारी ते4 जानेवारी दरम्यान नव्याने फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी भरलेल्या फॉर्मनुसार 6 व 7 जानेवारी रोजी आयटीआय स्तरावर रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.
राजेश मानकर (प्रचार्य आयटीआय सातपूर )