दोन हजार जणांनी शासकीय जागेवर थाटले अतिक्रमण

दोन हजार जणांनी शासकीय जागेवर थाटले अतिक्रमण

तेराशे अतिक्रमणे हटविण्यात यश

नाशिक | गोरख काळे

जिल्हयातील विविध भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Work Department) जागेवर अतिक्रमण (Encroachment) वाढल्याचे चित्र आहे.

तब्बल २ हजार १५९ लोकांनी अतिक्रमणे करीत राज्य महामार्ग,(State Highway) जिल्हा महामार्गाच्या शासकीय जागेवर (Government Land) अतिक्रमण करीत मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे.

या अतिक्रमाणामुळे काही ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची (Accident Spot) सतत भीती आहे. डिसेंबर २०२० पर्यतची ही आकडेवारी आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या अतिक्रमण धारकांवर कारवाई (Action On Encroachment) करण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल व्यक्त केला जात आहे.

अनेकांनी या जागेचा वापर दुकाने, घरे, हॉटेल, पत्र्याचे शेड थाटल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसात ३ हजार ३७१ पैकी केवळ १ हजार ३१२ अतिक्रमनच काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागात (Nashik Division) सर्वाधिक १ हजार ४०२ अतिक्रणधारकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे.

पाच विभाग मिळून २ हजार अतिक्रमणे काढण्याचे प्रलंबित आहेत. लोकांनी हॉटेल (hotels), पक्की घरे (Homes), भाजीपाला दुकाने (Vegetables Market), इलेक्ट्रॉनिक दुकाने (Electronics Shops), लाकूड व्यावसायिक, चायनीज दुकाने, गॅरेज अशा प्रकारची अतिक्रमणे केली आहे.

या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा (Traffic Jam) येत आहे. अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत, त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्याची मागणी वाहनधारकांकडून सातत्याने होते आहे. अनेक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमणे थाटली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पूर्व विभागाने कारवाई करत काही अतिक्रमणे हटविली आहेत, तर याआधी नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, नागरिक त्यास जुमानत नसल्याचे चित्र आहे.

जिल्हयात सर्वात कमी अतिक्रमणची संख्या कळवण विभागात (Kalwan Taluka) असून तेथे केवळ ८१ व्यक्तींनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विबागाच्या नाशिक विभागातून सर्वाधिक अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. दरम्यान करोनामुळे कारवाई (Corona Crisis) होऊ शकली नसल्याचीही चर्चा आहे.

प्रलंबित अतिक्रमणे

नाशिक विभाग : १४०२

उत्तर नाशिक विभाग : २३१

पूर्व विभाग : १९८

मालेगांव विभाग : २४७

कळ्वण विभाग : ८१

पुढार्‍यांचा हस्तक्षेप अन अधिकाऱ्यांची उदासिनता

अतिक्रमण हटविण्यास राजकीय पक्षातील व्यक्तींचा हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाला अतिक्रमण काढ्ण्यात रसच नसल्याने अतिक्रमण केलेल्या व्यक्तींचे फावते आहे. मात्र याचा सर्वसामान्य नागरिक अन वाहनधारकांना बसत असून लवकरात लवकर ही अतिक्रमणे काढण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com