फुलेनगर येथुन दोन तडीपारांना अटक

फुलेनगर येथुन दोन तडीपारांना अटक

नाशिक । Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालय (Nashik CP Office) तसेच ग्रामीण हद्दीतून (Rural Border) तडीपार केलेले दोन व्यक्ती फुलेनगर परिसरात (Phulenagar Area) वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavti Police Station) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश झुंबर आहेर ( 24, रा. महाराणा प्रताप नगर, भंडारी गल्ली, फुलेनगर, पंचवटी ) हा ( दि.18 ) एक वाजून पंचवीस मिनिटांनी महाराणा प्रताप नगर, भंडारी गल्ली, फुले नगर येथे तर गणेश तानाजी दातीर ( 28, रा. मायको दवाखाना, कालिका नगर ,लालबावटा गल्ली, फुलेनगर, पंचवटी, नाशिक ) हा ( दि.18 ) मायको दवाखाना, कालिका नगर, लालबावटा गल्ली, फुलेनगर येथे आढळून आला.

या दोनही संशयितांना (Suspect) नाशिक पोलीस आयुक्तालय व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही ते विनापरवानगी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com