घोटी : कंटेनर चालकास लुटणारे दोघे संशयित ताब्यात
नाशिक

घोटी : कंटेनर चालकास लुटणारे दोघे संशयित ताब्यात

माणिकखांब येथील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

घोटी | Ghoti

मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब शिवारात कंटेनर चालकास मारहाण करून तीन हजार रुपये लुटले. त्यांनतर घोटी पोलिसांनी काही तासातच तपासाची चक्रे फिरवत संशयित दोघांना ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की (दि. १६) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास इंदोर येथून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमपी०९- एचएच ०२२८) हा मुंबई - नाशिक महामार्गावर माणिकखांब शिवारात नादुरुस्त झाल्याने थांबला होता. याच दरम्यान दोन युवक एमएच -०५/बिएन-१४०६ या मोटारसायकलवर आले त्यांनी कंटेनरच्या कॅबिन मध्ये घुसून कंटेनरचालक मनोज श्रीराम रतन यादव (रा इंदोर,उ प्र) यास बेदम मारहाण केली. चाकूने दुखापत करून चालकाच्या खिशातील ३ हजार हिसकावून घेऊन पलायन केले.

या घटनेची माहिती घोटी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासातच या घटनेतील दोन्ही संशयित गोकुळ फुलचंद गांगड (१९), किशोर दिलीप गांगड (२२) दोघेही रा माणिकखांब (ता इगतपुरी) या लुटारू युवकांना जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन हजार रुपये जप्त केले.

पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वाघमारे शीतल गायकवाड, साळवे, मथुरे, प्रकाश कासार, नितीन भालेराव आदी करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com