
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar
इंदिरानगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन आत्महत्या (Suicide) झाल्याची घटना घडली आहे यात एक तरुणी असून एक महिला आहे...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फिया इब्राहिम पिंजारी (17, रा. मुमताज नगर, वडाळा गाव) हिने लोखंडी अँगलला सुती ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर खरोटे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत कविता शरद धंदर (35 वर्षे, रा. सिद्धी संकुल, म्हाडा कॉलनी, पाथर्डी गाव) यांनी राहत्या घरी बेडरूममधील छताला असलेल्या पंख्याला नायलॉन पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सपोउनि दौलत पाळदे करत आहे.