नाशिक शहर
नाशिक शहर
नाशिक

नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

आत्महत्यांमध्ये वाढ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

शहरात वेगवेगळया भागात दोघा युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सज्ञेय सुनिल पुराणीत (३५ रा.मौनगिरी कॉलनी, हिरावाडी) व आकाश संजय कर्डक (२३ रा. आंबेडकर चौक, स्वारबाबानगर) अशी आत्महत्या करणार्‍या युवकांची नावे आहे.

पहिली घटना स्वारबाबानगर भागात घडली. आकाश कर्डक या तरूणाने रविवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या आड्याला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच भाऊ राजू कर्डक यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत सज्ञेय पुराणीक यांनी शनिवारी (दि.१८) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सांगळे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com