प्रजासत्ताक दिनी 'आरोग्य'च्या दोन विद्यार्थ्यांचे दिल्लीत पथसंचलन

प्रजासत्ताक दिनी 'आरोग्य'च्या दोन विद्यार्थ्यांचे दिल्लीत पथसंचलन

नाशिक | Nashik

प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) नवी दिल्ली (New Delhi) येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातील दोन स्वंयसेवकांची निवड झाली आहे...

विद्यापीठाचे इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा पिल्लई फ्रॅन्को प्रिन्स व नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची सना शेख विद्यार्थ्यांची राजपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता निवड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) युवा व खेल मंत्रालय आणि राज्य शासन यांनी आदेशित केल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलन पथकात सहभागी होतात.

याअनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि. 12 ते 21 ऑक्टोबरदरम्यान पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागी स्वयंमसेवकातून उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करणाऱ्या राज्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

यामध्ये चार विद्यार्थी व चार विद्यार्थींनींचा समावेश असतो. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील दोन स्वयंसेवकांची राष्ट्रीय पथसंचलन पथकात पहिल्यांदा निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक संदिप कुलकर्णी, महाराष्ट्र व गोव्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक कार्तिकेयन, राष्ट्रीय सेवा योजने राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी विद्यार्थी कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बी. आर. पेंढारकर, कक्ष अधिकारी, के. आर. पाटील, आबा शिंदे, निकेश बागुल, विजया वाणी आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com