घोटी । Ghoti

घोटी - सिन्नर महामार्गावर (दि.४ रोजी धामणगाव शिवारात एका कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला.

या अपघातात दुचाकीवरील दोघेही युवक जागीच ठार झाले. हे युवक जवळच्याच एसएमबीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

याबाबत वृत्त असे की (दि.०४) रोजी घोटी सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात वीटभट्टीजवळ हा अपघात झाला. सिन्नरबाजूकडून घोटीकडे भरघाव वेगाने जाणाऱ्या मारुती इग्निस कारने (एमएच १५ जी एफ ७३०५) जात असताना घोटी बाजूकडून एसएमबीटीच्या दिशेने समोरून येणाऱ्या होंडा शाइन दुचाकीला (एमएच १० बीपी ९८५१) जोराची धडक दिली.

या अपघातात मोटारसायकल वरील एसएमबीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिषेक राजू जाधव (२१) व प्रथमेश सुरेश शेंडगे (२२) हे जागीच ठार झाले. या अपघाताला कारणीभूत असलेला कारचालक मात्र फरार आहे. या अपघाताचे वृत्त समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला.

एसएमबीटीचे भारत वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालक याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे हे पुढील तपास करीत आहे.