लासलगावला दोन दुकाने सील

पोलिसांची कडक कारवाई
लासलगावला दोन दुकाने सील

लासलगाव | Lasalgoan

जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एकीकडे कडक निर्बंध लावलेले असून जीवनावश्यक वगळता इतर सर्व आस्थापने बंद करण्याचे सूचित केले असतांना लासलगाव येथील ओम कलेक्शन आणि रोशन क्लोथ स्टोअर्स शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवत दुकान उघडे असल्याचे

येथे निफाड प्रांत आणि तहसीलदार यांच्या पथकाच्या निदर्शनास येताच दोन्ही दुकाने सील करण्यात आली .

करोनाचा वाढता प्रभाव पाहता प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि तहसीलदार शरद घोरपडे यांनी आज सायंकाळी अचानकपणे लासलगाव शहरात धाड टाकताच येथील ओम कलेक्शन आणि रोशन क्लोथ स्टोअर्स शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून आले.

दररोज जिल्ह्यामध्ये करोना ग्रस्त रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढत असताना शासनाला सहकार्य करण्याऐवजी बेकायदेशीर रित्या आपली आस्थापने सुरू ठेवून कोरोना वाढवण्याचा प्रकार या दुकानदारां मार्फत सुरू होता.

दररोज प्रशासना मार्फत जनजागृती सुरू असताना या कडे दुर्लक्ष करत काही दुकाने सुरू असून काही आस्थापना चालकाचे कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह असतांना देखील दुकाने सुरू असल्याची अनेक तक्रारी येत आहे. याकडे लक्ष देऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com