नाशिकरोड | प्रतिनिधी

शिवजयंतीचा फलक उचलून नेत असताना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने नाशिकमध्ये दोघा शिवभक्तांचा शॉक लागून मृत्यू झाला. येथील प्रभाग २२ मध्ये ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, येथील प्रभाग क्रमांक 22 मध्ये असलेल्या वडनेर दुमाला परिसरात दोन शिवभक्त शिवजयंतीचे फलक उचलून नेत होते.

फलकाच्या उंचीचा अंदाज न आल्याने अचानक विद्युत तारेला या फलकाचा स्पर्श झाला. या घटनेत दोघाही शिवभक्तांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली.

राज मंगेश पाळदे (रा. सौभाग्य नगर) व अक्षय किशोर जाधव (रा. वडनेर) अशी प्राण गमावलेल्या दोघांची नावे आहेत.

विजेचा धक्का बसल्याची घटना घडल्यानंतर दोघांनाही येथील बिटको हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी बिटको हॉस्पिटलमध्ये शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.