पुराच्या पाण्यात वाहून जातांना दोन जण बालबाल बचावले; पाहा व्हिडीओ...

सिन्नर | Sinnar

शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने (Cloudburst Like Rain) हाहाकार केलेला असून सगळीकडे नद्यांना (Rivers) पूर (Flood) आला आहे. तसेच काही धरणे (Dam) वेळेत भरल्याने वाहत असून अनेक बंधारे फुटले आहेत. अशातच आज कणकोरी-मानोरी रस्त्यावर जाम व लेंडी नदीच्या (Jam and Lendi River) संगमावर पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार बालंबाल बचावले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडे आठच्या सुमारास कणकोरी-मानोरी रस्त्याने (Kankori-Manori Road)दोन दुचाकीस्वार जात होते. परिसरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Rain) नदीला पूर आला होता. तर काही वाहने पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभी होती.

मात्र एका दुचाकीस्वाराने (Bike Rider) पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली,तो सुखरुप पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ गोविंद अहिरे व संजय आंधळे हे दोन दुचाकीस्वार गेले. परंतु पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह ते दोघे पुलावरुन पाण्यात लोटले गेले.

त्याचवेळी नदीपात्राच्या कडेला पूर पाहत उभे असलेल्या युवकांनी (Youth) क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उड्या घेत दोघांना वाचवले. यात दुचाकी पाण्यात वाहून गेली.या दोघा दुचाकी धारकांना युवकांनी वाचवल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com