अत्याचाराच्या दोन घटनांनी नाशिक हादरले

अत्याचाराच्या दोन घटनांनी नाशिक हादरले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर पुन्हा एकदा दोन अत्याचाराच्या घटनांनी हादरले आहे. या घटनांमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आज नाशिकमध्ये दोन अत्याचाराच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत संशयित आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन पिडीतेची आई कामाला गेली असताना घरात प्रवेश केला..... (Two rape cases registered in Nashik city)

यानंतर फिर्यादीच्या मुलीला आणि लहान भावांना धमकावत अत्याचार केला. नराधमाने या घटनेचे व्हिडीओदेखील काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

इथवरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने पिडीतेच्या लहान भावांनाही हे कृत्य करण्यास भाग पाडले. या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या नराधमाच्या विरोधात अत्याचार आणि पोस्को कायद्यांतर्गत मुंबई नाका पोलिसांत (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपीने महिलेशी ओळख निर्माण करत पत्नीपासून मला खूप त्रास असून तिच्यासोबत आपण घटस्फोट घेणार आहोत. तसेच तुझ्याशी लग्न करेल असे खोटे आमिष दाखवत फिर्यादी महिलेशी अंगलट करून वारंवार महिलेवर अत्याचार केला.

यानंतर महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लग्न करण्यास नकार देऊन फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.