नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) दोन कैद्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Complaint registered at Nashikroad police station)

यासंदर्भात कारागृहाचे अधिकारी प्रवीण विश्वनाथ विभांडीक (Pravin Vibhandik) यांनी तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, कारागृहाचे अधीक्षक साप्ताहिक संचार फेरी करत असताना त्यांना बघून विजय कुमार नंदकुमार रॉय हा कैदी मध्यवर्ती कारागृहातील दवाखान्याच्या विभागाजवळ प्रवेशद्वाराच्या नजीक असलेल्या फाटकाच्या बाहेर अधिकाऱ्यांना पाहत 'तुम मेरेको क्यो तकलीफ दे रहे है, मेरे को शांति से हो रहने दो असे म्हणत रॉय याने सोबत खिशातलं लपवून ठेवलेला लोखंडी पत्र्याचा तुकडा बाहेर काढून स्वतःच्या डाव्या हातावर मध्यभागी हाताने सपासप वार करून जखम करून घेतली.

त्यांनतर अंगावरील कपडे फाडून बरगडीला देखील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने जखम केली. तर दुसरी तक्रार कारागृहाचे शिपाई बिस्मिल्लाह शब्‍बीर तडवी यांनी दिली आहे. यात म्हटले आहे की, कैदी सागर राहुल जाधव 23 याने मंडल क्रमांक सातच्या यार्ड सर्कल क्रमांक पाच मध्ये असलेल्या बॅरेक नंबर 4 च्या समोरील कडू निंबाच्या झाडावर दोरी बांधली. तसेच यावेळी आत्महत्या करीन अशी धमकी देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या दोन्ही घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com