त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर
नाशिक

त्र्यंबकेश्वर शहरात दोघे पॉझिटिव्ह

तालुक्याची रुग्णसंख्या ३४ वर

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर शहरात आज दोघे करोनाबाधित आढळले असून यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच मुख्याधिकारी संजय जाधव यांनी परिसराची पाहणी करीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान आज सकाळी त्र्यंबक शहरातील दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून शहरात आता चार प्रतिबंधित झोन निर्माण झाल्याची माहिती डॉ. योगेश मोरे यांनी दिली आहे. या चारही झोनला रविवार व सोमवार या दोन्ही दिवस योग्य ती जंतुनाशक फवारणी व दक्षता घेतली जाते.

तसेच येथील नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाकडून तपासणी करण्यात येत आहे. गरज पडल्यास पुन्हा लॉक डाऊन करण्यात येईल असा इशाराही यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com