गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे जेरबंद

गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे जेरबंद

इगतपुरी | Igatpuri

नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने घोटीजवळ (Ghoti) देशी बनावटीचे कट्टे (Pistol) व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक (Arrested) करण्यात आली असून एकजण फरार आहे...

संशयित आरोपींवर घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी इगतपुरी तालुक्यातील आडवण (Advan) आणि वाडीवऱ्हे (Wadiwarhe) येथील आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. पी. गुरुळे, ठाकरे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिंगळ यांचे पथक घोटी येथील वैतरणा फाटा परिसरात अवैध अग्निशस्त्राबाबत गुप्त माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीप्रमाणे खंबाळेवाडी जवळील तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंबाळेवाडी शिवारात संदीप शिवाजी कोकणे (Sandip Kokane) (३०, रा. आडवण), अनिल एकनाथ येलमामे (Anil Yelmame) (३१, रा. वंजारी गल्ली वाडीवव्हे) यांनी पळून गेलेला गोकुळ गणेशकर (Gokul Ganeshkar) याच्याकडून दोन महिन्यापूर्वी विना परवाना बेकायदा अवैध २ देशी बनावटीचे कट्टे, २ जिवंत काडतुसे विकत घेतले होते.

त्यांच्या अंगझडतीत २ देशी बनावटीचे कट्टे, २ जिवंत काडतुसे, २ मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ४१ हजाराच्या वस्तू मिळून आल्या. संशयित आरोपी संदीप शिवाजी कोकणे, अनिल एकनाथ येलमामे यांना ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

No stories found.