
इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri
मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) जुन्या कसारा घाटात ( Old Kasara Ghat) आज गुरुवार (दि.१९) रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या आयशर वाहन क्रमांक (एम.एच.१५ एच.एच.९९७१) च्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ (Winter Bridge) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला असून वाहनचालक राहुल जाधव (३५) रा. खडकजांब, चांदवड जि. नाशिक व वाहक गणेश दुसिंग (३४) रा. खडकजांब, चांदवड जि. नाशिक अशी मृत्यु (Death) झालेल्यांची नावे आहेत. रात्री मुंबईहून येतांना झोपेची डुलकी लागल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले व अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
तसेच अपघाताची माहिती मिळताच पोलीस केंद्र घोटी, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तडवी, पोलीस कर्मचारी विनोद खाडे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, देवा वाघ, दत्ता वाताडे, नाना बोराडे सदस्यांनी सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात यश आले. अपघातातील दोनही मृतदेह जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ( Igatpuri Rural Hospital) पाठवण्यात आले.
दरम्यान, या घटनेत महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी हरी राऊत, रावसाहेब पवार, पोलीस कर्मचारी मधुकर पवार, दिपक दिंडे, सागर जाधव, रूग्णवाहीका चालक कैलास गतीर यांच्यासह कसारा पोलीस पथक व आपत्ती टिम यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.