दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार

सिन्नर | Sinnar

बारागाव पिंप्री-सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ (Sulewadi Phata) बुधवारी भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक (Accident) झाली. त्यात दोन तरुण जागीच ठार झाले...

अनिकेत बबन दिघे (25) रा. कानडी मळा, सिन्नर व सोमनाथ मधुकर हिलम रा. पांढरेवड, ता. नांदगाव अशी दोघा मृतांची नावे आहेत. अनिकेत हा हिरो शाईन दुचाकी क्र. एम. एच. 17 बी. जी. 7623 तर सोमनाथ हिलम हा होंडा लिनोआ दुचाकी क्र. क्र. एम. एच. 41 बी. जे. 1986 ने जात होता.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार
पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस; प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

भरधाव वेगात जाताना सुळेवाडी फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. अपघातात (Accident) दोघेही रस्त्यावर पडून डो्नयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना (Police) अपघाताची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जागीच ठार
एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला 'जय महाराष्ट्र', व्हिडीओ व्हायरल

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी एमआरयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शिपाई विलास जाधव पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com