
पेठ | प्रतिनिधी | Peth
येथील नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth Route) करंजाळीजवळ (Karanjali) ट्रक आणि मोटारसायकलचा (Truck and Motorcycles) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, करंजाळीजवळील पातळी गावातील युवक मोटारसायकल क्रमांक (एमएच ०३ पीए ५५४६) वरून पेठकडे येत असतांना गुजरातहून नाशिककडे (Gujarat to Nashik) येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच १२ व्हीएफ ०९०५) याची समोरासमोर धडक झाली.
दरम्यान, यावेळी मोटारसायकलवरील ललित गंगाराम गवळी (२१) व लहू नामदेव डोळे (२०) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने वाहन सोडून पलायन केले. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोउनि झिरवाळ करत आहेत.