Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) आज सोमवार (दि.५ रोजी) पहाटेच्या सुमारास आयशर, छोटा हत्ती व एक पिकअप यांच्यात विचित्र अपघात (Freak Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, या विचित्र अपघातात इस्तकार इजहर खान (वय २५ ) मुस्तपा खान (वय ३५) यांचा मृत्यु झाला असून वजीर खान हे जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital of Igatpuri) जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेद्वारे दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही पिकअपमधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या आहेत.

Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
१७०० कोटी पाण्यात! गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, थरारक VIDEO आला समोर

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस (Kasara Police) आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीमने घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. तसेच या अपघातामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com