नाशकातल्या 'या' खून प्रकरणी दोघांना ७ वर्षे सश्रम कारावास

नाशकातल्या 'या' खून प्रकरणी दोघांना ७ वर्षे सश्रम कारावास

नाशिक | Nashik

शिवाजी नगर (Shiwajinagar) येथे २०१८ मध्ये झालेल्या खून प्रकरणी दोन जणांना दोषी (Two Suspects) ठरवत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment of rigorous imprisonment) सुनावण्यात आली.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील बबन सोमा बेंडकुळे ( २५, रा. यशोधन रो हाऊस क्र. ७, शिवशक्ती चौक, सिध्दीविनायक गणेश मंदिरा जवळ शिवाजीनगर नाशिक ) हा सिध्दीविनायक गार्डनच्या (Siddhivinayak Garden) पाठीमागील कंपाऊडजवळ फोनवर बोलत उभा असतांना आकाश सुरेश पावर (२७ रा. शिवशक्ती चौक-२, शिवाजीनगर नाशिक), तुषार दिनेश लांडे ( २८ ,रा. थोरात पार्क, निलकंठेश्वर नगर अशोकनगर नाशिक) यांनी मोटार सायकलवर पाठीमागून येवून काही एक कारण नसतांना डोक्यात थापड मारली.

याबाबत बबन याने विचारणा केली असता तुषार याने याने बबन चे हात पकडून आकाश याने बबन च्या पोटावर, हातावर व मांडीवर चाकूने वार केल्याने गंभीर दुखापत करुन पळून गेले. त्यानंतर बबन यास उपचारार्थ खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरु असतांना बबन चा मृत्यू झाला. यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला.

या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक, एस. एस. वाघ यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने तपास करून आरोपीविरुद्ध सत्र व जिल्हा न्यायालय नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी ( दि. २२ ) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक ए. एस. वाघवसे यांनी गुन्ह्यातील आरोपीं विरुद्ध फिर्यादी, साक्षिदार ,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिती जन्य पुराव्यास अनुसरून दोन्ही आरोपीना ०७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १,०००/-रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा, सरकारी अभियोक्ता म्हणून योगेश डी. कापसे यांनी कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणून हवालदार जी.ए. पिंगळे व कोर्ट अंमलदार पोना. एस.यु.गोसावी यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com