दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेतच लस

प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या सूचना
दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेतच लस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या( Corona Vaccines ) चौथ्या टप्प्यात 12 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination of students in the age group of 12 to 14 years )शाळेतच केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागू होण्यापूर्वीच त्यांना कोअर बीव्हॅक्स (Core Bevax Vaccines )ही लस देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील एकूण 1217 शाळांमधील दोन लाख 21 हजार 841 विध्यार्थ्यांना ही लस मिळेल.

12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना 16 मार्च 2022 पासून करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 70 लाख 43 हजार 944 गृहीत धरुन त्यांना करोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेतच लस देण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी एकत्रितपणे आदेश दिले आहेत. शाळांना सुटी लागण्यापूर्वी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधून शाळेतच लसीकरण सत्र आयोजित करण्याचे आदेश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

शासकीय लसीकरण केंद्रामार्फतच ही लस मिळणार आहे. त्यामुळे खासगी केंद्राशी संपर्क न साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत 50 हजार बालकांनी हा डोस घेतलेला आहे. त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही.

ठळक नोंदी

* लसीकरण नोंदीसाठी ओळखपत्र, आधारकार्ड ग्राह्य.

* कोअर-बीव्हॅक्स लशीचा कुठलाही त्रास नाही.

* पालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही.

* शासकीय लसीकरण केंद्रामार्फतच लस मिळणार.

* ग्रामीण 960, नाशिक पालिकेत 205, मालेगावात 52 शाळा.

* 50 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण.

Related Stories

No stories found.