हरसूल : सव्वा लाखाचे खैराईचे लाकूड वाहनांसह जप्त

हरसूल : सव्वा लाखाचे खैराईचे लाकूड वाहनांसह जप्त

हरसूल | Harsul

चिंच ओहळ वन परिमंडळ वतीने हरसूल पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीरपणे वाहतूक करणारा खैराई लाकडाचा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान काल ( दि.१८) रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. चिंच ओहळ वन परिमंडळ या विभागातून खैराई लाकडाची चोरटी तस्करी होत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक मा.पंकज कुमार गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगवा पाडा या ठिकाणी सापळा रचण्यात आला.

यावेळी पहाटेच्या सुमारास वाहन टाटा 407 हे वाहन या रस्त्यावरून जात असतांना वन अधिकाऱ्यांनी अडविले.

सदर गाडीची तपासणी केली असता सव्वा लाख रुपयांचे खैराईचे लाकडासह अंदाजे दीड लाख रुपयांचा 407 टेम्पो जप्त करण्यात आला.

याबाबतचा पुढील तपास वनक्षेत्रपाल विवेक भदाणे व वन परिमंडळ अधिकारी रघुनाथ कुवर हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com