नाशिकरोड । Nashik

फुकट तसेच गैरप्रकाराने प्रवास करणा-या प्रवाशांकडून नाशिकरोड रेल्वेस्थानकात १८ टीसींच्या पथकाने २५ मार्चला एकाच दिवशी सुमारे दोन लाखांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे या विशेष कारवाईसाठी दुस-या स्थानकातील टीसींचे पथक आले होते.

बिना तिकिटे प्रवास करणारे, अनियमित तिकीट प्रवास, ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर करणारे यांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने भुसावळचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, मंडल वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक पाठक, मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया यांच्या मार्गदर्शनाखाली विषेश मोहिम हाती घेण्यात आली आहे.

नाशिकरोड स्थानकातील मोहिमत 18 टीसींनी सहभाग घेतला. नाशिकरोडचे मुख्य तिकीट निरीक्षक विजय धोटे, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली.

त्यामध्ये १३५ प्रकरणात अनियमित प्रवाशांकडून ९१ हजार ९६० रूपये, बिना तिकीट प्रवास करणा-या १३३ प्रकरणात ९१ हजार ४७० रुपये तर दोन प्रवाशांकडून ४९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दंड भरण्यात असमर्थ असणारे पाच प्रवासी होते. त्यांच्यावर रेल्वे अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.