सातपुर येथे दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ पॉझिटिव्ह

सातपुर येथे दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ पॉझिटिव्ह

सातपूर | Satpur

सातपूर येथील महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील पालिकेच्या रूग्णालयातील दोन्ही लॅब टेक्निशियन्स करोना संसर्गामुळे रजेवर आहे.

त्यांच्या गैरहजेरीमुळे तेथील लसीकरण व टेस्टिंगची सेवा कोलमडली असून, टेस्टिंगसाठी सोमवारपासूनच रुग्णांलयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.. दोन बदली टेक्निशियन तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सातपूर कॉलनीतील पालिकेच्या दवाखान्यामध्ये दररोज दीडशे ते दोनशे रुग्णांच्या अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. मात्र सलग पाच दिवस मोठी गर्दी होती.

या रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर सातपूर कॉलनीतील दोन्ही लॅब टेक्निशियन पॉझिटिव्ह झाल्याचे बोलले जात आहे. लॅब टेक्निशियन बाधित झाल्यामुळे लसीकरणही बंद करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

दोन दिवसांपासून नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. काल दुसऱ्या दिवशीही गर्दी दाटलेली होती.

प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सातपूर साठी दोन टेक्निशियन तातडीने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com