लासलगावी वाढली कांदा आवक; पहिल्याच दिवशी ४९३ ट्रॅक्टर माल विक्रीसाठी दाखल

लासलगावी वाढली कांदा आवक; पहिल्याच दिवशी ४९३ ट्रॅक्टर माल विक्रीसाठी दाखल

लासलगाव |वार्ताहर

येथील बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या वाहनचालकांची रपिड अन्टीजन टेस्ट (RAT) आहे की नाही हे तपासून वाहनांना प्रवेश देण्यात येत असल्याने प्रवेशद्वाराबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली होती. प्रवेशद्वारापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर्सच्या रांगा लागल्या होत्या..

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तब्बल 12 दिवसांनंतर बाजार समिती सुरू झाली. प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद करण्यात येत होती. नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही. त्यामुळे काहीसा गोंधळ याठिकाणी दिसून आला.

तब्बल बारा दिवसानंतर आज लिलाव सुरू होताच किमान सातशे तर जास्तीत जास्त 1481 रूपये व सरासरी 1300 रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर होत होता.

लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह कर्मचारी पहाट पाच वाजेपासुनच तपासणीनंतरच वाहने तापमानाची चाचणी कररूनच सोडतांना दिसुन आले. मात्र फक्त ५०० वाहनांना प्रवेश देण्यात आल्याने प्रवेशद्वारपासून दोन ते तीन किमी लांबपर्यंत रांगा वाहनांच्या लागलेल्या दिसून आल्या.

निर्बंधांचे काळात थेट व्यापारी वर्गाचे कांदा खळ्यावर कांदा विक्री करण्यासाठी आवाहन बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केले होते. वाहनांची गर्दी झाल्याने कोटमगाव रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करीत पिंपळगाव बसवंतकडे जाणारया वाहनांना रस्ता खुला करून दिल्यामुळे काहीशी कोंडी फुटण्यास मदत झाली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com