घोटी-सिन्नर मार्गावरील अपघातात दोन जण ठार

घोटी-सिन्नर मार्गावरील अपघातात दोन जण ठार

घोटी | Ghoti

घोटी सिन्नर मार्गावरील (Ghoti Sinnar Highway) बेलगाव तऱ्हाळे शिवारात अल्टो व होंडा मोबिलो (Honda Mobilo) या दोन्ही गाड्यांच्या अपघातात (Accident) दोघे जण ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये घोटी येथील तनिष्क सपंत जाधव (वय- १२) रा. घोटी, सुनील विठोबा गाडेकर (वय ३६) रा. ठाणगाव, तालुका सिन्नर (Sinnar) हे दोघे जण ठार झाले आहे.

याबाबत घोटी पोलिसांनी (Ghoti Police) दिलेल्या माहितीनुसार काल (दि.१९) रोजी घोटी हुन धामणगाव (Dhamangoan) कडे अल्टो कार (एमएच १५ एफ इन २१९९) ही या गाडी व ठाण्याकडे जाणारी होंडा मोबिलो (एमएच ०४ जीआर २११३) या दोन्ही गाड्यांची घोटी सिन्नर मार्गावरील बेलगाव शिवारातील हॉटेल सावी समोर समोरासमोर धडक झाली होती.

यामध्ये अल्टो कार मधील तनिष्क सपंत जाधव(वय 12) व सुनील विठोबा गाडेकर (३६) या दोघांना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात (SMBT Hospital) दाखल केले असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुहास गोसावी करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com