नाशिकरोड परिसरात कारच्या धडकेत आजोबा, नातवाचा मृत्यु

नाशिकरोड परिसरात कारच्या धडकेत आजोबा, नातवाचा मृत्यु
USER

नाशिक | Nashik

भरधाव कारने दुचाकीला (Car -Two Wheelar Accident) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नातु व आजोबा ठार झाल्याची घटना नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील सावता माळी (Sawata Mali Road) रोडवर मंगळवारी (दि.29) सकाळी घडली.

भगवान दगडू गायकवाड (67) व अरिन अविनाश अंबोरे (3, रा. डी.जी.पी.नगर, नाशिकरोड) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान गायकवाड हे त्यांच्या 3 वर्षीय नातवाला दुचाकीवर बसवुन घराकडे येत असताना यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या (Drink And Drive) कार चालक (एमएच 02 बीवाय 4415) याने दुचाकीस त्यांना पाठिमागुन जोराची धडक दिली.

यामध्ये गंभीर जखमी झोलेल्या दोघांना तातडीने जिल्हा रूग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले, परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Poice Station) नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com