बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरूण जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरूण जखमी

निफाड | प्रतिनिधी | Niphad

गेल्या काही वर्षांपासून गोदाकाठ (Godaghat) परिसरात बिबट्यांचे (Leopard) वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले असून बिबट्याच्या हल्ल्यात (Attack) अनेक बालकांचा बळी गेला आहे. तर पाळीव जनावरे देखील बिबट्याची शिकार ठरले आहेत....

तामसवाडी (Tamaswadi) येथे बिबट्याने दोन तरूणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले तर शिवरे (Shivare) येथे बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडल्याने संपूर्ण गोदाकाठ बिबट्याच्या दहशतीखाली असून वनविभागाने (Forest Department) बिबटे जेरबंद करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी अशी मागणी (Demand) होत आहे.

तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या तामसवाडी शिवारातील वडांगळी रस्त्यावर व पुंडलिक कांदे यांच्या वस्तीजवळ मंगळवारी सायंकाळी विकास गिते (Vikas Gite) (29), रोहित भोई (Rohit Bhoi) (23) हे मोटारसायकलवरून गावात जात असतांना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने यात या दोन्ही तरूणांच्या पायाला जखम झाली.

तेथील मयूर वैद्य या तरुणाने दोन जखमी तरुणांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात (Hospital) हलविले. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस या परिसरात दररोजच वीज (Electricity) गायब होते. त्यामुळे अंधारात हिस्त्र श्वापदांचा अंदाज येत नाही. तामसवाडी शिवारात ज्या दिवशी रात्रीच्या वेळेस हे तरूण बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याने जखमी झाले.

त्याच वेळेस शिवरे येथे गाजरवाडी फाट्याजवळ कादवा नदीकडे (Kadwa River) जाणार्‍या रस्त्यालगत राहणारे दिलीप कराड यांच्या वस्तीवरील 4 शेळ्या बिबट्याने फस्त केल्या असून वनविभागाने (Forest Department) घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

रसलपूर, कोठुरे, दिंडोरी, सारोळेथडी, नांदूरमध्यमेश्वर, तारूखेडले, म्हाळसाकोरे, करंजीखुर्द परिसरात देखील बिबट्याचे वास्तव्य असून या परिसरातील अनेक शेळ्या, मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. सध्या ग्रामीण भागात विजेचे भारनियमन रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने वस्तीवरील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून दिवसादेखील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होवू लागल्याने शेतीमशागतीची कामे ठप्प होवू लागली आहे. तालुक्याचा गोदाकाठ परिसर वनविभागाने बिबटे प्रवरण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. मात्र त्या तुलनेत नागरिकांना सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही.

सध्या द्राक्षांसह ऊस हंगाम अंतिम टप्प्यात असून कांदा काढणी देखील शेवटच्या टप्प्यात आली आहे. मात्र या परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने कधी कोणत्यावेळी बिबट्या कुठल्या शेतातून प्रगट होईल याची शाश्वती नसल्याने शेतकर्‍यासह शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. वनविभागाने (Forest Department) बिबटे जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरे लावावेत. तसेच ज्या शेतकर्‍यांची (Farmers) जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी (Demand) होत आहे.

Related Stories

No stories found.