शहरात दोनशे तीस पोलीसांच्या बदल्या

वरिष्ठ अधिकार्‍यांपाठोपाठ कर्मचार्‍यांमध्ये बदल
शहरात दोनशे तीस पोलीसांच्या बदल्या

नाशिक । Nashik

शहर आयुक्तालयात नवनियुक्त पोलीस आयुक्तांनंतर एक पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त दाखल झाले आहेत. तर आयुक्तायात सकारात्मक बदल करण्यासाठी आयुक्तांनी बदल्यांना प्राधान्य दिले आहे.

शहरातील 12 हवालदार, 117 शिपाई तर 99 पोलिस नाईक आणि काही सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत.

नाशिक परिक्षेत्र, शहर आयुक्ताय, जिल्हा तसेच महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अशा सर्व प्रमुख ठिकाणी नवे कारभारी दाखल झाले आहेत. कारभार्‍यांनी त्यांच्या पसंतीने कामास सुरूवात केली असून त्या प्रमाणे आवश्यक तेथे बदल्या करण्यास सुरूवात केली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाठोपाठ शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना गती देण्यात आली आहे. यात कर्मचार्‍यांच्या पसंतीस प्राधन्य देण्यात आले असून, याचा फायदा अनेक वर्षांपासून अडगळीत काम करणार्‍यांना कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी. सुरूवातीस अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलिस ठाणे निहाय गुन्हे शोध पथकात बदल केले. आता प्रशासकीय बदल्यानिमित्त कर्मचार्‍यांची जबाबदारी बदलण्यात येत आहे. प्रशासकीय बदल्या नियमीत असल्या तरी यंदा प्रथमच कर्मचार्‍यांच्या पसंतीस महत्त्व देण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या 90 टक्के बदल्या याच पद्धतीने झाल्या असून, पहिल्या पसंतीच्या ठिकाणी कर्मचार्‍याने नुकतेच काम केले असेल तरच त्यास दुसरा पर्याय स्विकारावा लागला आहे. आतापर्यंत एकुण 230 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर उर्वरीत बदल्यांची प्रक्रिया सुरू असल्याचे सुत्रांनी सांगीतले. यामध्ये पोलीस निरिक्षकांमध्येही खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com