बिपीन बाफना हत्या प्रकरण : सुनावणी पूर्ण, कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय

बिपीन बाफना हत्या प्रकरण : सुनावणी पूर्ण, कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय
बिपीन बाफना हत्या प्रकरण : सुनावणी पूर्ण, कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय

नाशिक | Nashik

शहरातील बिपीन बाफना (Bipin Bafna) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण (Abduction) करून त्याची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना जून २०१३ मध्ये घडली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Additional Sessions Court) दोघांना दोषी ठरवत अन्य तिघांविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे...

अतिरिक्त सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायालयाने चेतन यशवंत पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा,केवडीबन, पंचवटी) यांना दोषी ठरविले. तर अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड) यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच दोघा दोषींना गुरुवार (दि.१५) रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

दरम्यान, ८ जून २०१३ रोजी मयत बिपीन गुलाबचंद बाफना हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून घरातून गेला होता. त्यानंतर बिपीनचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करत मोबाईलवरून फोन करून त्याच्या वडिलांकडून एक कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितली होती. यानंतर पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या दोषींनी बिपीन बाफना याची निर्घृणपणे हत्या केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com