घोटीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे दर्शन

घोटीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीचे दर्शन

घोटी | वार्ताहर | Ghoti

दिवंगत काँग्रेस (Congress) नेते गोपाळराव गुळवे (Gopalrao Gulve) यांच्या स्मृतिदिननिमित्त काँग्रेसच्या एका गटाने घोटी बाजार समितीत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. तर दुसर्‍या गटाने पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दुसरीकडे कार्यक्रमाचे आयोजन करून गटाबाजीचे दर्शन घडवले. त्यामुळे घोटी काँग्रेसमधील गट किती विकोपाला गेले याची चर्चा दिवसभर होती...

गुळवे जनतेच्या अंतःकरणात : थोरात

लोकांच्या अंतःकरणात स्थान निर्माण केलेला आणि जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे तर राज्यात काँग्रेसची पाळेमुळे खोलपर्यंत रुजवण्याचे काम लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी केले. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या हितासाठी कामे करावीत, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

घोटी येथे गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते इगतपुरी तालुका खरेदी- विक्री संघाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खा. हेमंत गोडसे (Hemant Godse), आ. हिरामण खोसकर, आ. सुधीर तांबे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ, शरद आहेर, रामकृष्ण लहवितकर, अ‍ॅड. संदीप गुळवे, राजाराम पानगव्हाणे, उपसभापती गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, माजी सभापती संपत काळे, गोपाळ लहांगे, पांडुरंग शिंदे, शोभा बच्छाव, देवीदास पिंगळे, शिवाजी शिरसाठ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी संदीप गुळवे यांनी शेतकर्‍यांच्या समस्या मांडताना सांगितले की, भावलीचे पाणी शहापूरला न पाठवता तालुक्यालाच मिळावे. तसेच औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार मिळावा. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांचे यावेळी कीर्तन झाले.

कार्यक्रमासाठी उपसभापती विठ्ठल लंगडे, शिवाजी शिरसाठ, नंदलाल पिचा, सरपंच जयराम धांडे, रमेश जाधव, रामदास बाबा मालुंजकर, सरपंच अनिल भोपे, हरिष चव्हाण, पांडुरंग वारुंगसे, प्रशासक तुकाराम वारघडे, सुदाम भोर, भरत आरोटे, कचरू कडभाने, कैलास भगत, विष्णू राव, आंबादास कालेकर, सचिव जितेंद्र सांगळे, विठोबा दिवटे आदी उपस्थित होते.

दुसर्‍या गटाकडून पुतळ्यास अभिवादन

काँग्रेसच्या दुसर्‍या गटाने दिवंगत गोपाळराव गुळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले. मनोगत व्यक्त करताना माजी आमदार शिवराम झोले म्हणाले, गुळवे यांनी स्वतः आमदार, खासदार न होता अनेक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी केले. यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे माझ्यासारख्या शेतकर्‍यास दोनदा आमदारकी मिळाली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले.

काँग्रेस पक्षाशी शेवटपर्यंत प्रामाणिक होते. एनएसयूआयपासून त्यांच्या विचारांंवर कार्य करत आज त्यांच्या पश्चात काँग्रेसच्या प्रदेश कमिटीपर्यंत मजल मारण्यात त्यांच्या विचारांची बांधिलकी कारणीभूत असल्याचा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी केला.

यावेळी ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, ज्येष्ठ नेते कचरू शिंदे, संतू पा. खातळे, निवृत्ती कातोरे, बाळासाहेब कुकडे, जिल्हा चिटणीस देवराम नाठे, खरेदी- विक्री संघाचे माजी चेअरमन सुनील जाधव, ज्येष्ठ नेते शांताराम कोकणे, तालुका कार्याध्यक्ष अरुण गायकर, सरचिटणीस संपतराव मुसळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com