जुन्या नाशकात दोन गटात तुफान हाणामारी

जुन्या नाशकात दोन गटात तुफान हाणामारी

नाशिक | Nashik

बॕनरचा धक्का लागल्याच्या कारणावरून जुन्या नाशिकमधील कसाई वाड्यात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारींन्वये भद्रकाली पोलिसांनी दोन गटांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.

मजहर अल्लाउद्दीन शेख (वय २४, वडाळा रोड) याने दिलेल्या तक्रारीनुसार, बॕनरचा धक्का लागल्याचे कारण तसेच चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने हल्ला चढवला.

या तक्रारींन्वये परवेज उर्फ गब्बू निसार शेख, आवेश निसार शेख, सुफियाना उर्फ घारू निसार शेख (तिघेही रहाणार कलाल बिल्डिंग, जुने नाशिक), आरबाज सलीम शेख (बिरबल आखाडा, चौक मंडई) यांच्यासह नऊ जणांविरूद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, भादंवि कायदा कलम , मुंबई पोलिस कायदा १३५, आपत्ती व्यवसाय कायदा कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com