निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

ओझे l वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) निळवंडी (nilwandi) येथील शेतकरी (farmers) उत्तम पोपट घुटे यांच्या वस्तीवर रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने (Leopard)

दोन शेळ्यावर (goat) हल्ला करून एक शेळी गायब केली असून दुसऱ्या शेळीच्या मानेवर हल्ला करून जखमी करण्यात आले होते यात या जखमी शेळीचाही सकाळी मुत्यू झाला असून वनविभागाकडून (Forest Department) या शेळीचा पंचनामा (panchanama) करण्यात आला आहे.

शेतकरी (farmer) पोपट घुटे यांनी त्वरित वस्तीवर पिंजरा (cage) लावण्याची मागणी केल्यामुळे वनविभागाने सदर घटनेची दखल घेवून घटनास्थळी पिंजरा लावल्याची माहिती वनरक्षक गोरख गांगुर्डे (Forest Guard Gorakh Gangurde) यांनी दिली आहे.

पोपट घुटे यांच्या वस्तीवर एक महिन्यापुर्वी त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले होते रात्री पुन्हा यांच वस्तीवरील शेळ्यावर हल्ला केल्यामुळे तसेच या आधीही निळवंडी येथे बिबट्याच्या (Leopard) अनेक घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com