नाशिक | प्रतिनिधी

करोना च्या काळात आर्थिक संकटामुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक फटका बसला त्यामुळे नोकरीची मध्ये कर्मचाऱ्यांची कपात झाली. काही कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात झाली. असंख्य प्रश्नांना सध्या सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेकजण बेरोजगार झालेले आहे...

काही ठिकाणी कामगार नोकरी सोडून गेल्याने संधी आहेत याच संधीचे सोने करत हे युवक बेरोजगारांचे तारणहार झाले आहेत. सोशल मीडिया'चा मग त्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप, लिंक्डइन, टेलेग्राम अशा विविध सामाजिक माध्यमांचा वापर करून प्लेसमेंटचे काम करत आहेत.

'जॉब मनिया' नावाने हे ग्रुप सध्या सोशल मीडियातून युवकांमध्ये नोकरीबाबतची माहिती पुरवित आहेत. आतापर्यंत एकूण २१ व्हाटसअप्प ग्रुप असून प्रत्येक ग्रुपला २५६ युवक आहेत. असे एकूण ५००० युवकांना ते मार्गदर्शन हे दोघेही मित्र करता आहेत.

कोणताही मोबदला न घेता ग्रामीण भागातील मुलांसाठी अहोरात्र झटून नोकरी मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सुमारे ८ वर्षापूर्वी पदवी घेतल्यावर नोकरीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला असा संघर्ष एवढे शिकून आपल्या ग्रामीण भागातील शिकलेल्या बेरोजगार मुलांना येऊ नये त्यांना अचून माहिती मिळावी व रोजगार मिळावा हाच उददेश त्यांचा यामागे आहे असे ते सांगतात.

नोकरीशिवाय सुशिक्षित बेकार असणारया युवकांना विनामूल्य मार्गदर्शनही करतात. ग्रामीण भागातील उमेदवार नोकरीसाठी अचानक शहरात आल्यानंतर शहराचे वातावरण बघून तो घाबरतो. अशा उमेदवारास आधार देत नोकरीसाठी माहिती दिली जाते. कधी कधी उमेदवारांची नोकरी मिळवण्यासाठी हजारो लाखो रुपयांची मोठी फसवणूक होत असते.

अशा वेळेला आपल्या ग्रामीण भागातील युवकांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक कोणी करू नये म्हणून हे दोघे युवक त्यांना मार्गदर्शन करून जॉब लागेपर्यंत त्यांची मदत करत असतात.

आयटी क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रातील कंपन्यात असणाऱ्या रिकाम्या जागांची त्यांना तेथील संपर्कामुळे माहिती असते. प्रत्येक कंपनीच्या एच आर. चे नंबर त्यांच्याकडे असल्याने कंपनी व उमेदवार दोघांना फायदा होतो.

ग्रामीण भागातून आलेल्या व नोकरीची गरज असणाऱ्या उमेदवारांना योग्य ठिकाणी नोकरीसाठी पाठवणे गरजेचे असते. काही कंपन्यांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा असतो पण कंपनी उमेद्वारापर्यंत पोहचू शकत नाही. आम्ही फक्त कंपनी व उमेदवार यांच्यातील दुवा होतो. एखाद्या बेरोजगार युवकाला नोकरीसाठी मदत करणे हा आनंद खूप मोठा आहे, तो कुठल्याही तराजूत मोजला जात नाही.
कुणाल पवार, सटाणा (नाशिक)

आज समाजमाध्यमे खूप प्रभावी आहेत त्यांचा फक्त योग्य वापर करणे गरजेचे आहे. आम्ही वेगळे असे काहीच करत नाहीत फक्त आमचा काही वेळ यासाठी देतो पण या केलेल्या कामाचा आनंद फार मोठा आहे.
संदेश बाबर, सटाणा नाशिक