डांगसौंदाणेजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू; दोन गंभीर

डांगसौंदाणेजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू; दोन गंभीर

डांगसौंदाणे | प्रतिनिधी Dangsaundane

डांगसौंदाणे-कळवण रस्त्यावर बुंधाटे गावा शेजारी आज दुपारच्या सुमारस झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे....(Accident on Dangsaundane kalwan road)

याबाबत सविस्तर वृत असे की, बुंधाटे येथील अनंत नंदूदास बैरागी (वय 32) हे आपल्या कळवण रोडवरील शेतात जाण्यासाठी दुचाकी (MH 41 AL 8417) ने निघाले असता शेतापासून हाकेच्या अंतरावर कळवण कडून येणाऱ्या दुचाकी (MH41 AV 3262)ची समरोसमोर धडक झाल्याने दुचाकी चालक अनंत नंदूदास बैरागी 32 रा बुंधाटे व किरण सुभाष सोनवणे 18 रा. किकवारी बुद्रुक यांचा या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

सर्वच जखमींना ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे आणण्यात आले असता दोघांना मृत घोषीत करण्यात आले. तर दोघा जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून एकाची प्रकुर्ती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.(Civil Hospital Nashik)

याबाबत सटाणा पोलिसात (Satana Police Station) मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनमोलवर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार जयतसिंग सोळंकी, पोलीस शिपाई निवृत्ती भोये पंकज सोनवणे, सागर बेलुस्कर, निलेश पवार आदी तपास करत आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की दोघा ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे अपघातातील तरुण अनंत बैरागी हा बुंधाटे चे उपसरपंच नंदूदास बैरागी यांचा मुलगा असुन किकवारी येथील मृत तरुण आदिवासी गरीब कुटुंबातील असल्याने दोघा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com