नाशिकमधील दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

नाशिकमधील दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

नासिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक इंडीयन मेडीकल असेासिएशनच्या (President of Nashik Indian Medical Association Dr. Rajshree Patil )अध्यक्षा डॉ राजश्री पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराजसह सुन सावनी या दोघांचा अमेरिकेत अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेेचे वृत्त कळताच पाटील कुंटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कॅॅलीफोर्निया (California ) हायवे पेट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण नापा येथील महामार्ग २९ वरून रविवारी सकाळी एका पुरुष आणि महिलेचा मृत्यू झाल्याचे आढळले .सकाळी ८:०५ ला , अधिकार्‍यांना हायवे २९ आणि सोस्कोल फेरी रोड येथे अपघाताच्या ठिकाणी बोलावण्यात आले, . ३२ वर्षीय पृथ्वराज कार चालवत होते. आणि त्याची ३० वर्षीय पत्नी सावनी त्यात होती, दोघेही सांता क्लारा येथील रहिवासी होते, त्यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले.

दोघेही महामार्गावरून दक्षिणेकडे वेगाने जात होते, तेव्हा कार उजव्या बाजुला वळली तेव्हा एका कारला धडक बसली. वेगात असल्याने कार हवेत उडाली.आणि विरुद्ध बाजूच्या तटबंदीला धडकली. अपघातामुळे झालेली छोटी आग त्वरीत पोहोचलेल्या अधिकार्‍यांनी विझवली.अपघातानंतर महामार्ग २९ खुला झाला. परंतु सोस्कोल फेरी रोड बराच वेळ बंद होता. अमेरीकेतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com