हळदीचा कार्यक्रमावरून येत असताना अपघातात दोघांचा मृत्यू

मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक
हळदीचा कार्यक्रमावरून येत असताना अपघातात दोघांचा मृत्यू
USER

इंदिरानगर । Indiranagar

मालवाहु ट्रकने दिलेल्या धडकेत राजीव नगर येथे दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना (दि. ०९) मंगळवार रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम गवळी (वय २२ रा. चुंचाळे), राहुल जिभाऊ सूर्यवंशी (वय २५ रा. सावता नगर, नवीन नाशिक) हे (दि.०९) मंगळवार रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एम.एच १८ एएम २०७८) डबल सीट बसून तपोवन पंचवटी येथुन त्याचे मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परत येत असताना कलानगर कडून मुंबई हायवे कडे जात असताना राजीवनगर वसाहतीचे कॉर्नर जवळ गाडीचे वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू ट्रकने (एम.एच १९ झेड ४०५४) जोरदार धडक दिली.

त्यात दुचाकीवरील शुभम गवळी, राहुल सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मालवाहू ट्रक चालकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व पो नी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी बारेला अधिक तपास करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com